शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी

By admin | Updated: March 2, 2017 01:08 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नूतन त्र्यंबक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी कॉप्या पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी दिसून आली

 त्र्यंबकेश्वर : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या नूतन त्र्यंबक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाली आहे. पहिला पेपर इंग्रजीचा होता. पहिल्याच दिवशी कॉप्या पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी दिसून आली. तथापि, आत भरारी पथक आले होते. त्यामुळे काही काळ कॉपी पुरविणारे व कॉपीबहाद्दर यांची पंचाईत झाली होती. या नंतर मात्र परीक्षा सेंटरमध्ये सर्रास कॉप्या होत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तर परीक्षागृहात येथे खिडक्यांमधून दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी कॉप्या फेकल्या जात होत्या तसेच आवारात काही ठिकाणी कागदांचा खच पडल्याचे चित्र होते. वर्गातील पर्यवेक्षकाने विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे होते.ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात प्रथमच बारावीचे पेपर सुरू असून, बाहेरून कॉपी देण्यास वाव नसला तरीदेखील परीक्षा दालनात पाहून लिहिण्याची मुभा असावी, असा अंदाज वाटत होता. त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाच्या आवारात कॉपी पुरविणाऱ्यांची चाहुल पोलिसाना लागताच कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दरांनी पळ काढीत होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबकेश्वर या तालुकास्थळी १६४० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. या मुख्य केंद्रात ब्रह्मा व्हॅली अभिनव कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, हरसूल (ज्युनिअर), हरसूल (सिनिअर), खरशेत, बोरीपाडा, मूळवड, तळेगाव (अं.) अशा नऊ शाळांचा समावेश आहे. तसेच ब्रह्मा व्हॅली उपकेंद्र आहे.