तुटलेल्या तारा अन् खचलेले खांब

By Admin | Updated: September 8, 2016 00:35 IST2016-09-08T00:34:53+5:302016-09-08T00:35:02+5:30

वीज वितरणचे दुर्लक्ष : ग्रामस्थांमध्ये संताप

Broken stars and broken pillars | तुटलेल्या तारा अन् खचलेले खांब

तुटलेल्या तारा अन् खचलेले खांब

 स्थळ : जोरण
वेळ : दुपारी १२ वाजता
बागलाण तालुक्यातील जोरण येथील उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या व खांब तीन महिन्यांपासून तुटून पडले आहेत. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
जोरण उपकेंद्राचे अभियंता पी. एफ. अहिरे व त्यांचे कर्मचारी यांनी या कामाची कुठल्याही दखल घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकवेळा तक्रार करून फायदा झाला नाही. येथील शेतकरी मोठाभाऊ ऊखा पवार यांच्या जोरण शिवारातील शेतगट नं. १४७मधून गेलेल्या उच्च वाहिनीच्या विद्युतवाहक तारा व खांब तुटून तीन महिन्याचा कालावधी लोटला असून, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी कोणतीही हालचाल केली नाही. जोरणचा विंचुरे फीडरवर अतिभार दिल्याने सुरळीत विद्युतपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत
नाही. परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे. विंचुरे फीडरवर जोरणचा अतिभार दिल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

Web Title: Broken stars and broken pillars