शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

ताणेपर्यंत तुटे; पण उमेदवार कुठे?

By admin | Updated: September 16, 2014 00:07 IST

ताणेपर्यंत तुटे; पण उमेदवार कुठे?

 

नाशिक : गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ जागा लढविणाऱ्या सेनेला तीन व सहापैकी एक जागा मिळविणाऱ्या भाजपात होऊ घातलेल्या विधानसभेच्या जागावाटपावरून बेबनाव निर्माण होऊन त्यातून युती तुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा आगामी निवडणुकीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. निवडणूकपूर्व चाचणीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा धरलेला आग्रह व आता नेमकी तशीच परिस्थिती समोर उभी ठाकल्याने वरकरणी युती संपुष्टात आणण्याचे दोन्ही पक्षांच्या निवडणूक इच्छुकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी, महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीची तयारी वर्षभरापासून करीत असलेल्या दोन्ही पक्षांत ऐनवेळी सर्वच मतदारसंघांत उमेदवार कोठून आणायचे, असा प्रश्न आ वासून उभा आहे. सेना-भाजपाच्या युती तुटण्यावर ‘शिंक्याचे तुटणे व बोक्याचे फावणे’ अशा पद्धतीने दोन्ही कॉँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष ठेवून आहेत; परंतु युती दुभंगल्यास त्याचे बरे-वाईट परिणाम उपरोक्त पक्षांवरही होणार आहेत. ज्यांना कॉँग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळणार नाही, त्यांच्यासाठी सेना-भाजपाची दारे जशी उघडली जातील तसेच मनसेलाही युतीच्या मतविभाजनाचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सेना-भाजपाचे स्वबळावर लढण्याचा जिल्ह्यातील नाही म्हटले तरी सात ते आठ मतदारसंघांच्या राजकारणावर निश्चित परिणाम होईल, हे मात्र खरे.