शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टिचैतन्यासाठी वरुणराजाला साकडे

By admin | Updated: June 10, 2016 23:36 IST

सृष्टिचैतन्यासाठी वरुणराजाला साकडे

गंगापूजन : स्वामी समर्थ सेवामार्गाचा रामकुंडावर सोहळापंचवटी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व गंगा गोदावरी पुरोहित संघ यांच्या वतीने रामकुंड येथे शुक्रवारी सायंकाळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते व शेकडो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत गंगापूजनाचा मंगलमय सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गंगा गोदावरीचे पूजन करण्यात येऊन भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, देशात हरितक्रांती घडावी यासाठी साकडे घालण्यात आले. ज्येष्ठ १ ते ज्येष्ठ शु.१० या दहा दिवसांच्या कालावधीत संपूर्ण भारतभर गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. नद्या आपल्याला उपकृत करणाऱ्या माता आहे, त्या केवळ मानवालाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला नवचैतन्य देतात म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र गंगा दशहरा उत्सव साजरा करून गंगा गोदावरीला पर्जन्यवृष्टीसाठी साकडे घालतात. या गंगापूजन कार्यक्रमनिमित्ताने दुपारी गंगापूररोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेकडो महिला मंगल कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. गंगामातेचे नामस्मरण करीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक रामकुंड येथे आल्यानंतर मोरे यांनी सपत्नीक विधिवत गंगापूजन करून आरती करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. देशात कधी नव्हे इतका भीषण दुष्काळ पडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागत आहे. अशा स्थितीत पर्जन्यराजाला विनंती करण्याची दीडशे वर्षांची परंपरा पाळली जात आहे. त्यातून यंदा निश्चितच चांगला पाऊस पडेल आणि शेतकरी तसेच देशभरातील नागरिक सुखी समृद्ध होतील, असा विश्वास गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.यावेळी सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले. कार्यक्र माला खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, शिक्षण मंडळांचे सभापती संजय चव्हाण यांच्यासह शेकडो सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)