शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

सुस्थितीतील रस्ते फोडून नव्याने डांबरीकरण

By admin | Updated: January 12, 2017 01:02 IST

निवडणुकीची लगीनघाई : भ्रष्टाचार होत असल्याची बागुल यांची तक्रार

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर १९२ कोटी रुपयांचे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचा गाजावाजा केला जात असताना शहरात अनेक ठिकाणी चांगले रस्ते फोडून डांबराचे थरावर थर टाकले जात आहेत. त्यामुळे चांगले रस्ते फोडून नवे रस्ते करण्यातून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. या सर्व प्रकारांची चौकशी करण्याची मागणी कॉँग्रेसचे नेते, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी केली आहे. शहरातील रस्त्यांची ओरड होत असताना अंतर्गत रस्त्यांची कामे थांबवून ठेवली जातात आणि निवडणुकीच्या तोंडावर सर्व रस्त्यांच्या कामांची एकत्रित गोळाबेरीज करून शंभर सव्वाशे कोटी रुपयांची कामे निवडणुकीच्या तोंडावर केली जातात. मात्र, हे करताना सध्या चांगले रस्ते फोडून त्यावर डांबराचे थरावर थर रचले जात आहेत. त्यामुळे चांगले रस्ते फोडून महापालिकेचे नुकसान केले जातेच, शिवाय नव्याने डांबर टाकण्यासाठी खर्च केला जातो. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागातील वावरे लेन, भद्रकाली, येवलेकर लेन आणि भद्रकाली टॅक्सी स्टॅण्ड या भागात रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण करतानाच असाच प्रकार सुरू आहे. नागरिकांची मागणी नसताना आणि कामांची गरज नसताना ही कामे केली जात आहेत. ज्या रस्त्यांचे आयुर्मान आणखी दहा ते पंधरा वर्षे आहे, असे रस्ते जेसीबीने उखडून त्यावर नवीन रस्ते बांधणीचा घाट घातला जात आहे. नागरिकांकडून कररूपाने गोळा झालेल्या पैशांची ही लूट असून, जनतेच्या पैशातून अशाप्रकारची चुकीची कामे करून त्याचे श्रेय घेण्याचे गंभीर प्रकार सुरू असल्याचे राजेंद्र बागुल यांंनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहराच्या अन्य भागातही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून, डांबरीकरण केले नसतानाही ते उखडून फेकले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना प्रलोभने दाखवण्यासाठी हा अट्टहास आहे, शिवाय टक्केवारी मिळवण्याचा खटाटोप असल्याची टीका करण्यात येत आहे.