कामठवड्यात घरात घुसून महिलेसह कुटुंबाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 01:25 IST2021-09-23T01:24:58+5:302021-09-23T01:25:42+5:30
अंबडगाव, कामठवाडा भागातील हनुमान मंदिरासमोरील आई बंगला येथे घरात घसुन महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपींतांना मंगळवारी (दि.२१) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

कामठवड्यात घरात घुसून महिलेसह कुटुंबाला मारहाण
नाशिक : अंबडगाव, कामठवाडा भागातील हनुमान मंदिरासमोरील आई बंगला येथे घरात घसुन महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपींतांना मंगळवारी (दि.२१) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रशांत भिला गुंजाळ, (२५) समाधान गुंजाळ (३०) भिला गुंजाळ या तिघांनी सोमवारी (दि.२०) जुन्या भांडणाची कुरापत काढून कामठवाडा येथील हनुमान मंदिरासमोरील आई बंगला येथील फिर्यादी महिलेच्या घरात घुसून हातातील लोखंडी व लाकडी दांंड्याने फिर्यादीचा मुलगा, पती व सून यांना मारहाण करून जखमी केले. तर मुलीला शिवीगाळ करीत अपशब्द वापरल्याची फिर्यादी महिलेने अंबड पोलीस ठाण्यत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या प्रकरणातील तिन्ही संशयितांना अटक केली आहे.