शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

नाशिक-पुणे महामार्गावर ‘शिवनेरी’ला ब्रेक; ‘शिवशाही’ वर  प्रवाशी वाहतूकीची दारोमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 3:50 PM

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरला. नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर बारा शिवनेरी वातानुकूलित बसेस दररोज धावत होत्या. या मार्गावर दिवसाला २४ फेर्‍या शिवनेरी पूर्ण करीत होती; मात्र शिवनेरीची जागा आता ‘शिवशाही’ बसने घेतली आहे. यामुळे आजपासून ...

ठळक मुद्दे‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरला.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरला. नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर बारा शिवनेरी वातानुकूलित बसेस दररोज धावत होत्या. या मार्गावर दिवसाला २४ फेर्‍या शिवनेरी पूर्ण करीत होती; मात्र शिवनेरीची जागा आता ‘शिवशाही’ बसने घेतली आहे. यामुळे आजपासून शिवनेरी बस या मार्गावर धावणार नसल्याचे महामंडळाच्या नाशिक विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सध्या नाशिक-पुणे मार्गावर चौदा शिवशाही बसेस दिवसाला २८ ते ३० फेर्‍याद्वारे प्रवासी वाहतूक करीत आहे. दरम्यान, या मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्‍या निमआराम वर्गातील ‘हिरकणी’लाही महामंडळाने विश्राम दिला आहे. एकूण २७ निमआराम बसेस या मार्गावरील थांबविण्यात आल्या आहेत. एकूणच धार्मिक पुण्यनगरीवरून विद्येचे माहेरघर गाठणाºयांना ‘शिवशाही’चा एकमेव आधार महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. एसटी प्रशासन उत्पन्न व प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपक्र म, योजना राबवित आहेत. खासगी प्रवासी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना प्रवाशांना अत्याधुुनिक स्वरूपाच्या बसेसमधून प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा मात्र भाडे शिवनेरीच्या तुलनेत अर्धेच असल्याने या शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने ‘शिवनेरी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळNashikनाशिक