शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

नाशिक जिल्हा रुग्णालयात होणार मेंदूवर शस्त्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 6:32 PM

जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून मेंदूविकार तज्ज्ञ नसल्यामुळे अपघातात जखमी होऊन डोक्याला मार लागलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित असूनही रुग्णाला मात्र त्याच्या तपासणीतून उपचारासाठी फायदा होत

ठळक मुद्देकंत्राटी पद्धतीने भरती : विशेष तज्ज्ञांची लवकरच नियुक्तीनवजात शिशु, किडनी रोग तज्ज्ञांचीही नेमणूक करण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्टÑीय आरोग्य मिशन अंतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी व विशेष तज्ज्ञांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिल्याने नाशिक जिल्ह्यात थेट मुलाखतीद्वारे विशेष तज्ज्ञांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, या भरतीचे वैशिष्टे म्हणजे जिल्हा रुग्णालयाला पहिल्यांदाच मेंदूविकार तज्ज्ञ मिळणार आहे. या शिवाय नवजात शिशु, किडनी रोग तज्ज्ञांचीही नेमणूक करण्यात येणार असल्याने आता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून मेंदूविकार तज्ज्ञ नसल्यामुळे अपघातात जखमी होऊन डोक्याला मार लागलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित असूनही रुग्णाला मात्र त्याच्या तपासणीतून उपचारासाठी फायदा होत नव्हता. त्यासाठी मेंदूवरील उपचारासाठी एकतर रुग्णाला खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत किंवा उपचाराअभावी मृत्यूला कवटाळावे लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता त्यातून रुग्णांची सुटका होणार असून, राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत दोन आठवड्यांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील विविध विशेष तज्ज्ञांच्या सुमारे ८० पदांच्या कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून थेट मुलाखतींसाठी बोलविले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पदांसाठी पात्र ठरलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या असता, त्यात एक मेंदूविकार तज्ज्ञ, एक कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन, अकरा स्त्रीरोगतज्ज्ञ, सहा बालरोगतज्ज्ञ, सात भूलतज्ज्ञ, किडणी रोगतज्ज्ञ, नवजात शिशुतज्ज्ञ, सूक्ष्म जीवशस्त्र तज्ज्ञ, एक सर्जन, आठ वैद्यकीय अधिकारी अशी अनेक पदे भरण्यात आली आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लवकरच नियुक्ती देण्यात येणार असून, यातील तज्ज्ञांची जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गरजेनुसार नियुक्त्या देण्यात येणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद