त्र्यंबकेश्वर : येथील प्रयाग तीर्थात एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असताना दिसून आला. याबाबत पांडुरंग बाबूराव कोठुळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला माहिती दिली. या इसमाचे वय अंदाजे ४८ वर्षे असून, रंग गोरा, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे, दाढी वाढलेली, उंची ५ फूट ७ इंच सडपातळ, डाव्या हातात तांब्याचे कडे घातलेले आहे. याबाबत त्र्यंबक पोलीस अधिक तपास करीत आहेत. तरी या इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधावा.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}