कोटमगाव शिवारात व्यापाऱ्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:26 IST2021-03-25T19:25:59+5:302021-03-25T19:26:21+5:30
येवला : येवला - अंदरसुल रोड वरील कोटमगाव शिवारात चारी नंबर ४२ जवळ मंगळवारी (दि.२३) युवकाचा मृतदेह आढळून आला.

कोटमगाव शिवारात व्यापाऱ्याचा मृतदेह
ठळक मुद्देअंदरसूल येथील किराणा व्यापारी हरिभाऊ भाऊसाहेब देशमुख यांचा सदर मृतदेह
येवला : येवला - अंदरसुल रोड वरील कोटमगाव शिवारात चारी नंबर ४२ जवळ मंगळवारी (दि.२३) युवकाचा मृतदेह आढळून आला.
या बाबत पोलीस पाटील यांनी शहर पोलीसात खबर दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस नाईक सचिन राऊत, किरण सोनवणे आदींनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता. अंदरसूल येथील किराणा व्यापारी हरिभाऊ भाऊसाहेब देशमुख (३२) यांचा सदर मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.
पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.