१६०० फूट खोल दरीत आढळला नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:45 IST2025-03-15T12:45:00+5:302025-03-15T12:45:35+5:30

हा तरुण नाशिक शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. गुगलद्वारे माहिती घेत तो हरिश्चंद्रगडावर पोहोचला.

Body of a young man studying engineering in Nashik found in a 1600 foot deep valley | १६०० फूट खोल दरीत आढळला नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृतदेह

१६०० फूट खोल दरीत आढळला नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृतदेह

Nashik Student Death: हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्याच्या १६०० फूट खोल दरीत नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मित्राच्या दुचाकीने तो वसतिगृह सोडून गडाकडे रवाना झाला होता. तो बेपत्ता झाल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. गुरुवारी त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. बुधवारी रात्री साडेबारा वाजता शोधकार्य सुरू करण्यात आले होते.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ऋषिकेश जाधव असं २१ वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी होता. शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो शिकत होता. गुगलद्वारे माहिती घेत तो हरिश्चंद्रगडावर पोहोचला. दोन दिवस त्याचा शोध घेण्यात आला. त्याने सोबत नेलेली दुचाकी गडाच्या खाली दिसली होती. त्या आधारे दरीत शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

नाशिक तसेच अकोले येथील रेस्क्यू पथकाने ऋषिकेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. ऋषिकेशच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर  पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. बुधवारी डेला अॅडव्हेंचर, लोणावळा आणि नाशिक क्लाइम्बर्स अँड रेस्क्यूर्स असोसिएशन या दोन रेस्क्यू टीम पाचनई गावामध्ये रात्री दोन वाजता पोहोचल्यावर पहाटे ४ वाजता हरिश्चंद्रगड गडावर पोहोचले.

दरम्यान, पहाटेच्या कोकणकडावरून रॅपलिंगने चारजणांची टीम अवघड खोल दरीत उतरली. रॅपलिंगने ऋषिकेशचा मृतदेह मध्यावर आणण्यात आला.

Web Title: Body of a young man studying engineering in Nashik found in a 1600 foot deep valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.