ओढा रेल्वे स्थानकाजवळ रूळावर आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:06 IST2019-05-08T18:05:48+5:302019-05-08T18:06:19+5:30
पश्चिमेला रेल्वे रुळावर युवकाचा मृतदेह आढळला. पहाटेच्या सुमारास सदर घटना निदर्शनास आल्याने ओढा रेल्वे स्टेशनमास्तर ब्रह्म क्षत्रिय यांनी पोलिसांना खबर दिली.

ओढा रेल्वे स्थानकाजवळ रूळावर आढळला मृतदेह
पंचवटी : आडगाव शिवारातील ओढा रेल्वेस्टेशनच्या जवळ एका ३० वर्षीय युवकाचा रु ळावर सोमवारी (दि.६) मृतदेह आढळून आला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेल्वेस्टेशनजवळ पश्चिमेला रेल्वे रु ळावर युवकाचा मृतदेह आढळला. पहाटेच्या सुमारास सदर घटना निदर्शनास आल्याने ओढा रेल्वे स्टेशनमास्तर ब्रह्म क्षत्रिय यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदर युवकाने आत्महत्या केली की रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला याबाबत साशंकता असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.
--