आदिवासींना ब्लॅँकेटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 18:27 IST2018-12-14T18:26:05+5:302018-12-14T18:27:11+5:30
शहरी भागात वास्तव्य करून ऐश आरामात आपले जीवन जगत असतानाही विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या तळागाळातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात देऊन साई दत्त संस्थान व बीएमडब्ल्यू ग्रुपने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.

झरी ( ता. पेठ) येथे साड्या व ब्लँकेट वाटप करताना साई दत्त संस्थानचे सदस्य.
पेठ : शहरी भागात वास्तव्य करून ऐश आरामात आपले जीवन जगत असतानाही विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या तळागाळातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात देऊन साई दत्त संस्थान व बीएमडब्ल्यू ग्रुपने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
पेठ तालुक्यातील झरी हे पार नदीच्या तीरावर वसलेले महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर गाव या गावात जायचे म्हणजे एक दिव्य पार करून जाण्यासारखे अशा गावात जाऊन संस्थानच्या वतीने ६०० साड्या, थंडीपासून बचाव होण्यासाठी ३०० ब्लँकेट, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच साक्षरता अभियान, महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयावर जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी साई दत्त संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोमासे, नगरसेवक प्रियंका माने, धनंजय माने, शंतनू शिंदे, दादासाहेब गायकवाड, आपुलकीचे अध्यक्ष खंडेराव डावरे, किशोर बडगुजर, माणिक कानडे, शरद शिंदे, बार्टीचे समता दूत अरूण सुबर, उत्तम कराटे, दीपक जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.