शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

By संजय पाठक | Updated: June 7, 2024 09:02 IST

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही.

संजय पाठक, नाशिक- लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीच आपले काम केले असा आरोप केला असून अप्रत्यक्षरीत्या छगन भुजबळ  यांच्याकडे निर्देश केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी आरोपांचे खंडन केले असून भुजबळ यांनी सर्वाधिक आघाडीवर राहून काम केले असे म्हटले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. सुमारे 18 दिवसांचा कालावधी गेल्यानंतर भुजबळ यांनी आपण उमेदवारी स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचेही प्रयत्न केले होते. दरम्यान, हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित झाली आणि त्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सुमारे एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे नाराज झालेल्या हेमंत गोडसे यांनी घटक पक्षातील सर्व पक्षांनी काम केले.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही नेत्यांनीच काम केले असा आरोप केला छगन भुजबळ यांनी निवडणुकीत काम केले नाही काय या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कोणी काम केले नाही हे सर्वांनाच माहिती आहे असे सूचक विधान केले. त्यावर प्रतिज्ञा देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया ही पराभवाने झालेल्या नैराश्येतून आली आहे असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीत सर्वाधिक काम केले आहे. छगन भुजबळ हे भर उन्हात गोडसे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी रॅली सहभागी झाले होते या उलट महायुतीचे नेते हे ऐनवेळी हजेरी लावून पुन्हा निघून गेले होते असे त्यांनी सांगितले. हेमंत गोडसे विधान चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४NashikनाशिकHemant Godseहेमंत गोडसेChhagan Bhujbalछगन भुजबळMahayutiमहायुती