पिंपळगाव लेप सोसायटी अध्यक्षपदी काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:04+5:302020-12-05T04:24:04+5:30

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रमेश गागरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर शंकर काळे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ...

Black as President of Pimpalgaon Lap Society | पिंपळगाव लेप सोसायटी अध्यक्षपदी काळे

पिंपळगाव लेप सोसायटी अध्यक्षपदी काळे

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रमेश गागरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर शंकर काळे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी शोभा गागरे यांची निवड झाली. येवला येथील सहायक निबंधक कार्यालयात अध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठक झाली. यावेळी निर्धारित वेळेत काळे यांचा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बोरसे यांनी काळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

याप्रसंगी मधुकर साळवे, बाळासाहेब दौंडे, रघुनाथ काळे, रामभाऊ दौंडे, दिनकर दुनबळे, रमेश गागरे, प्रवीण काळे, संतोष पोटे, सुखदेव ढोकळे, सोमनाथ पोटे, सयाजी ठुबे, विष्णू गागरे, सोपान हराळे, जगताप, बापू पोटे, विठ्ठल गागरे आदी संचालक उपस्थित होते.

===Photopath===

041220\04nsk_37_04122020_13.jpg

===Caption===

पिंपळगाव लेप येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर काळे यांची बिनविरोध निवड झाली, त्याप्रसंगी उपस्थित संचालक मंडळ.०४ पिंपळगावलेप१

Web Title: Black as President of Pimpalgaon Lap Society