शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पश्चिम मतदारसंघ राखण्यात भाजपला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:55 AM

सेनेची बंडखोरी व पंचरंगी लढतीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपने सलग दुसऱ्यांचा विजयश्री खेचून आणली असून, अतिशय अटी-तटीच्या लढतीत ९७११ मताधिक्क्याने आमदार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत.

नाशिक : सेनेची बंडखोरी व पंचरंगी लढतीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपने सलग दुसऱ्यांचा विजयश्री खेचून आणली असून, अतिशय अटी-तटीच्या लढतीत ९७११ मताधिक्क्याने आमदार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. सीमा हिरे यांना ७७,७०० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्टवादीचे अपूर्व हिरे हे ६७,९८९ मते घेऊन दुसºया क्रमांकावर राहिले. शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले.सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. त्यासाठी चौदा टेबल लावण्यात आले होते. प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली असता, त्यात सेनेचे बंडखोर विलास शिंदे यांना २९६३ मते मिळाली, तर सीमा हिरे यांना २८६४, राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांना २०३६, तर माकपाचे डॉ. डी. एल. कराड यांना ७३४ मते मिळाली. मनसेचे दिलीप दातीर यांना ४३१ मते मिळाली. टपाली मतदानात सेना बंडखोराला मतांची आघाडी मिळाल्याचे पाहून सेनेत काही वेळ आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मात्र तो पहिल्या फेरीतच संपुष्टात आला. पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल दीड तासाने जाहीर करण्यात आला. त्यात सेनेने विलास शिंदे हे सर्व उमेदवारांपेक्षा आघाडीवर होते. सीमा हिरे यांच्यापेक्षा ८९ जादा मते घेतली. सीमा हिरे यांना २८६४ तर अपूर्व हिरे यांना २०३६ मते मिळाली. तेव्हापासूनच ही लढत काट्याची ठरण्याची चिन्हे दिसू लागली होती. पहिल्या फेरीत मनसेचे दिलीप दातीर यांना ४३७, डी. एल. कराड यांना ७४६ मते मिळाली. दुसºया फेरीत मात्र विलास शिंदे तिसºया क्रमांकावर फेकले गेले व सीमा हिरे यांनी तब्बल दोन हजार मतांची आघाडी घेतली. दुसºया क्रमांकावर राष्टÑवादीचे अपूर्व हिरे यांना ३९३४ मते मिळाली.मतमोजणीचा कल साधारणत: असाच कायम राहिला. नवव्या फेरीपर्यंत सीमा हिरे व राष्टÑवादीचे अपूर्व हिरे यांच्यात तीन ते साडेतीन हजार मतांचा फरक होता. सीमा हिरे यांनी सातत्याने त्यात आघाडी कायम ठेवली. अपूर्व हिरे समर्थकांना अखेरपर्यंत आघाडी मिळण्याची आशा लागून राहिली होती. परंतु प्रत्येक फेरीत सीमा हिरे कायम पुढे राहिल्या विसाव्या फेरीनंतर मात्र सीमा हिरे यांनी साडेतीन हजारांहून अधिक आघाडी घेतली व अखेरच्या सात फेऱ्यांमध्ये साधारणत: नऊ हजारांपर्यंत मताधिक्य वाढल्याने अपूर्व हिरे समर्थकांनी केंद्रातून काढता पाय घेतला.या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे सेनेची बंडखोरी राष्टÑवादीच्या पथ्थ्यावर पडेल असे वाटले होते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात सेनेचे बंडखोर विलास शिंदे यांन मतदारांनी स्वीकारले नाही व सेनेचे सिडकोत २२ नगरसेवक असतानाही शिंदे यांना जेमतेम १६,४२९ मते मिळाले.मतमोजणी रोखलीपश्चिम मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना टेबल क्रमांक चार ४ वर बुथ क्रमांक ७७ ची मतमोजणी केली जात असताना ईव्हीएमसोबतच्या पाकिटात मतदान केंद्राध्यक्षाच्या स्वाक्षरीचा फॉर्म १७ नसल्याचा आक्षेप उमेदवारांच्या प्रतिनिधींनी घेतला. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे यांनी सदर ईव्हीएममधील व्हीव्हीपॅटची मतमोजणी करण्याचे आश्वासन दिल्याने उमेदवारांचे समाधान झाले व पुन्हा मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-west-acनाशिक पश्चिमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस