शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे हल्लाबोल आंदोलन : पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:46 IST

राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले.

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी महावितरणच्या कार्यालयात भाजपाचे हल्लाबोल आंदोलन

नाशिक : कोरोनाकाळात जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीजबिल वसुली करून जनतेला त्रास देत असल्याचा आरोप करीत राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांचा विरोध झुगारून भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय आवारात प्रवेश करून महावितरणच्या कार्यालय आवारात प्रवेश केला. त्यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापटही झाली. अखेर पदाधिकाऱ्यासमवेत कार्यकर्त्यांनीही कार्यालयाच्या आवरात घसून कार्यालयाला कुलूप लावले.

कोरोनाकाळात आलेले अवाजवी वीजबिल भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीजबिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिले दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी महाविकास आघाडीच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची हिंमत महाविकासआघाडी सरकारमध्ये नसेल तर निदान अशी सक्तीने वीजबिले वसुली करणे, थांबवावे अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल अशा इशाराही देवयांनी फरांदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हिमगौरी आडके, नगरसेवक प्रशांत जाधव, स्वाती भामरे, देवदत्त जोशी, हरिभाऊ लोणारी, गणेश कांबळे, अमित घुगे, पवन भगुरकर, देवा जाधव आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयelectricityवीजDevyani Farandeदेवयानी फरांदे