शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा महापौरपदाचा उमेदवार तीन दिवसांत

By admin | Updated: March 1, 2017 00:26 IST

नाशिक : शहराच्या महापौरपदासाठी भाजपाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या असून, येत्या तीन दिवसांत सुकाणू समितीच्या बैठकीत घोषित करण्यात येणार आहे.

नाशिक : शहराच्या महापौरपदासाठी भाजपाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या असून, येत्या तीन दिवसांत सुकाणू समितीच्या बैठकीत घोषित करण्यात येणार आहे. याशिवाय आता उपमहापौर आणि अन्य पदांसाठीदेखील भाजपात हालचाली सुरू झाल्या आहेत. अन्य पक्षांमध्ये नोंदणी आणि गटनेता पदासाठी धावपळ सुरू असून, शिवसेनेत मात्र विरोधी पक्षनेता पदासाठी चुरस आहे.महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्तेचा लोलक कोणाकडे जाणार याची चुरस यंदा नाही. तरीही नाशिकचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी असून, त्यात भाजपाकडे पाच उमेदवार आहेत. रंजना भानसी या ज्येष्ठ नगरसेवक असल्याने त्यांचा दावा असला तरी पक्षात अन्यही उमेदवार आहेत. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत सुकाणू समितीची बैठक होईल आणि त्यात महापौर तसेच उपमहापौरपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले.  येत्या दोन दिवसांत भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांकडे विवाह सोहळे असून, ते पार पडल्यानंतरच महापौरपदाच्या निवडणुकीसाठी निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. भाजपाकडून उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समितीचे दावेदार अधिक असून, त्यामुळे आता त्यासाठीही व्यूहरचना होणार आहेत.  शिवसेनेते विरोधी पक्षनेता पदासाठी चर्चा सुरू आहे. सध्याच्या पद्धतीप्रमाणे विरोधी पक्षनेता आणि गटनेता अशी दोन पदे राहिल्यास त्यानुसार दोन ज्येष्ठांना संधी मिळणार आहे. महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि सुधाकर बडगुजर यांच्या दावेदारीबरोबरच आता आपल्या प्रभागातच चारही शिवसेना उमेदवार निवडून आणलेल्या विलास शिंदे यांनीही दावेदारी केली आहे. (प्रतिनिधी)