रीलचा नाद बेतला जीवावर! भाजप नेत्याच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू; 'अॅक्शन ब्रेक' स्टंट ठरला जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:14 IST2026-03-21T16:12:16+5:302026-03-21T16:14:50+5:30

कर्नाटकात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला.

BJP leader 15 year old son dies in Hubli car crash | रीलचा नाद बेतला जीवावर! भाजप नेत्याच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू; 'अॅक्शन ब्रेक' स्टंट ठरला जीवघेणा

रीलचा नाद बेतला जीवावर! भाजप नेत्याच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू; 'अॅक्शन ब्रेक' स्टंट ठरला जीवघेणा

Hubli Accident: सोशल मीडियावरील रील आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. कर्नाटकचे भाजप नेते वीरभद्रप्पा संगलाद यांचा १५ वर्षीय मुलगा नमीश संगलाद याचा एका रील शूटिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ऑडी कार आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांच्यातील हाय-स्पीड स्टंटमुळे हा अपघात झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

नमीश हा म्हैसूरमध्ये नववीत शिकत होता. १९ मार्च रोजी उगादी सण साजरा करण्यासाठी तो हुबळीतील आपल्या घरी आला होता. गुरुवारी दुपारी ४:३० ते ४:४५ च्या सुमारास नमीश आपल्या मित्रांसह हुबळीच्या बाहेरील बाजूस असलेल्या शेजावाडकर लेआउट या निर्जन ठिकाणी रील शूट करण्यासाठी गेला होता.

'अॅक्शन ब्रेक' स्टंट पडला महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण अॅक्शन ब्रेक रील बनवत होते. यामध्ये समोरून येणारी ऑडी कार आणि विरुद्ध दिशेने येणारी ओला इलेक्ट्रिक दुचाकी वेगाने एकमेकांकडे येतात आणि शेवटच्या क्षणी ब्रेक लावून वळण घेतात. या चित्रीकरणादरम्यान कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने नमीशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

जागीच मृत्यू आणि पोलिसांची कारवाई

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार नमीशच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नमीशचे वडील वीरभद्रप्पा संगलाद यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, कार चालक निष्काळजीपणे आणि झिग-झॅग पद्धतीने गाडी चालवत होता, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.
 

Web Title : रील स्टंट जानलेवा: भाजपा नेता के बेटे की कार दुर्घटना में मौत

Web Summary : हुबली में रील की शूटिंग के दौरान भाजपा नेता के 15 वर्षीय बेटे की मौत हो गई। कार और इलेक्ट्रिक बाइक से जुड़ा एक हाई-स्पीड स्टंट गलत हो गया जब कार नियंत्रण खो बैठी और दुर्घटनाग्रस्त हो गई। पुलिस ने नाबालिग कार चालक के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Reel stunt turns fatal: BJP leader's son dies in car accident.

Web Summary : A 15-year-old son of a BJP leader died in Hubli during a reel shoot. A high-speed stunt involving a car and electric bike went wrong when the car lost control and crashed. Police have filed a case against the underage car driver.