शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:09 IST

मुख्य सोहळ्यास देवयानी फरांदे यांनी उपस्थित न राहता बहिष्कारच टाकला. मात्र, नंतर त्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व आपण निष्ठावंतांसाठी भांडत असल्याचे सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : उद्धवसेनेत असलेले दोन माजी महापौर, काँग्रेसचे स्थायी समितीचे माजी सभापती, तसेच राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी आमदार यांना भाजपत प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्याने गुरुवारी पक्षातील असंतोष उफाळून आला. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यादेखील या प्रवेशाबाबत अंधारात असल्याने त्यांच्या समर्थकांनी आणि अन्य निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातला, तसेच पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला. त्यातून मोठ्या मुश्किलीने ते व्यासपीठावर पोहोचल्यावर प्रवेश सोहळा पार पडला.

राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी आमदार नितीन भोसले,  शाहू खैरे (काँग्रेस), माजी महापौर विनायक  पांडे (उद्धवसेना), माजी महापौर यतीन वाघ (उद्धवसेना), दिनकर पाटील  (मनसे)  यांना पक्षात घेताना भाजपतच नाराजी उफाळून आली. त्यात शाहू खैरे, विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या प्रवेशाला विरोधाची धार अधिकच दिसून आली. सकाळी अकरा वाजेपासून भाजप कार्यालयात नाराज गट एकत्र झाला. निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात असल्याचा  आरोप नाराज गटाने केला. 

नाराजांनी प्रवेशद्वारावरच केले कडे शाहू खैरे यांच्या विरोधात गेल्या वेळी निवडणूक लढून पराभूत झालेले  भाजपचे गणेश मोरे व त्यांचे समर्थक पक्ष प्रवेशाला विरोध करण्यासाठी  जोरदार  घोषणाबाजी करीत होते. आम्ही हा प्रवेशसोहळा उधळून लावू, पहिले मंत्री महाजन व आमदार  फरांदे यांनी येथे येऊन आमच्याशी चर्चा करावी, असे  म्हणत नाराज गटाने पक्ष प्रवेशद्वारावरच कडे तयार  केले. तेव्हा पोलिस फोर्स मोठ्या प्रमाणात भाजप कार्यालय परिसरात तैनात करण्यात आला. 

उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात भाजपतील नाराजी उफाळून आली. बाहेरच्यांना पक्षात आणून त्यांना तिकीट देऊन पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. प्रचंड विरोधानंतरही भाजपने नाराजांना डावलून पाच प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. 

हॉटेल अन् पक्ष कार्यालयात एकाचवेळी ड्रामा

भाजपच्या निवडणूक प्रमुख तथा आमदार देवयानी फरांदे यांनी सकाळी ११ वाजता मंत्री महाजन यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेत खैरे, पांडे यांच्या पक्ष प्रवेशाला उघड विरोध केला. नाराज गटदेखील हॉटेलबाहेर थांबून हाेता. बराच वेळ या विषयावरून खल सुरू असताना तिकडे एन.डी. पाटील रोडवरील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेशाला विरोध करण्यासाठी जोरदार राडा सुरू होता. मुख्य सोहळ्यास देवयानी फरांदे यांनी उपस्थित न राहता बहिष्कारच टाकला. मात्र, नंतर त्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व आपण निष्ठावंतांसाठी भांडत असल्याचे सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP infighting in Nashik over party entry, high-voltage drama.

Web Summary : Nashik BJP faced internal strife as veteran leaders from other parties joined, sparking protests. Disgruntled members clashed, opposing perceived favoritism towards newcomers over loyalists. Despite the uproar, the induction ceremony proceeded after negotiations and tension.
टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेGirish Mahajanगिरीश महाजन