भाजप प्रबळ दावेदार, शिवसेनेतील गोंधळ यंदा टळेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:32 PM2021-12-29T14:32:52+5:302021-12-29T14:37:01+5:30

इंदिरानगर - गेल्या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार ठरवताना झालेला विलंब भाजपच्या पथ्यावर पडला आणि सेनेच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून लढावे लागले. आता ...

BJP And ShivSena Politics in nashik | भाजप प्रबळ दावेदार, शिवसेनेतील गोंधळ यंदा टळेल?

भाजप प्रबळ दावेदार, शिवसेनेतील गोंधळ यंदा टळेल?

googlenewsNext

इंदिरानगर - गेल्या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार ठरवताना झालेला विलंब भाजपच्या पथ्यावर पडला आणि सेनेच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून लढावे लागले. आता भाजपला सध्या तरी अनुकूल असलेला प्रभाग तसा कठीण नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची तयारी सुरू असली तरी आव्हान देण्यासाठी मात्र परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

प्रभाग क्रमांक ३० मध्ये इंदिरानगर, राजीव नगर, राज सारथी सोसायटी, पांडव नगरी, कलानगर, वडाळा गाव, सह परिसर येतो सध्या भाजपचे सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे नगरसेवक आहेत. मूळ इंदिरा नगरचा परिसर हा भाजपचा मतदार असलेला मानला गेला, तरी

गेल्या पाच निवडणुकांचा इतिहास बघता शिवसेना, भाजप व मनसेचा देखील प्रभाव राहिला आहे. गेल्या निवडणुकीत सेनेला पक्षातील दिरंगाईचा फटका बसला. संजय चव्हाण, रशिदा शेख, शंकुतला खोडे आणि नीलेश चव्हाण हे उमेदवार होते. मात्र, त्यांना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास शिल्लक असताना एबी फार्म देण्यात आला. तो निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला नाही. त्यामुळे या चौघांना पुरस्कृत करण्याची वेळ पक्षावर आली हेाती. यंदा चूक सुुधारली जाईल. मात्र, उमेदवारात बदल होतील. मुळात संजय चव्हाण यंदा या प्रभागातून इच्छुक दिसत नाही. अन्य ही बरेच बदल झाले आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार महाआघाडी झाल्यास आघाडीचे आव्हान असेल नाही तर शिवसेना, मनसे व राष्ट्रवादीचे आव्हानास सामोरे जावे लागेल. त्यामुळे सर्वांचे लक्ष राहून राहील. अर्थात तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सर्वच पक्षांना केवळ एक नव्हे तर तिन्ही सक्षम उमेदवार देण्याची गरज असून साहजिकच आयारामांवर नजर असणार आहे.

संभाव्य उमेदवार 

भाजप सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुनील खोडे, अनिकेत सोनवणे.

राष्ट्रवादी काँग्रेस- योगेश दिवे, नईम शेख, जय कोतवाल.

शिवसेना- संजय गायकर, नीलेश साळुंके, सागर देशमुख.

मनसे- पद्मिनी वारे.

समस्या

- वडाळा गावातील सुमारे ५० ते ६० जनावरांची गोठे कायम.

- धोकादायक बेकायदा भंगार गोदामांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

- उघड्या नाल्यात भूमिगत गटारीच्या पाण्यामुळे घाण व दुर्गंधी.

- वाढत्या गुन्हेगारीमुळे दहशत.

 

Web Title: BJP And ShivSena Politics in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.