शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा

By admin | Updated: May 3, 2017 01:18 IST

राजरत्ननगर : बालकांना केले लक्ष्य; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

सिडको : पिसाळलेल्या कुत्र्यानेधुमाकूळ घालीत चिमुकल्या बालकांसह १७ जणांना चावा घेत गंभीर जखमी केल्याची घटना सिडकोतील राजरत्ननगर भागात गेल्या सोमवारी (दि. १) सकाळाच्या सुमारास घडली. चावा घेतलेल्या बालकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्यास सुमारे पाच तासांनी पकडण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेच्या नि:श्वास सोडला.वार सोमवार, वेळ सकाळी अकरा वाजेची. अचानक राजरत्ननगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या बाबतची माहिती नगरसेवक रत्नमाला राणे व भूषण राणे यांना कळताच त्यांनी याबाबतची माहिती महापालिकेस कळविली. परंतु कुत्र्याने काही वेळातच राजरत्ननगर भागासह परिसरातील चिमुकल्या बालकांसह १७ जणांना चावा घेऊन जबर जखमी केले. यात रोहित पाटील (७), हेमंत दोंदे (६), प्राजक्ता कांबळे (५), सोहम वाघ (४), चेतना पाटील (दीड वर्ष) सर्व राहणार राजरत्ननगर, सिडको तसेच एका वृद्धासह १७ जणांना चावा घेतला. या घटनेमुळे नागरिकांनी मनपाच्या आरोग्य विभागाबाबत नाराजी व्यक्त केली असून, अशा मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)‘ते’ श्वान अखेर जेरबंदनाशिक : सिडकोतील उत्तमनगर, मोरवाडी परिसरात पिसाळलेल्या श्वानाने दोन-तीन बालकांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. १) घडल्यानंतर महापालिकेच्या पथकाने सदर श्वानास जेरबंद केले असून, श्वान निर्बिजीकरणाची मोहीम नियमित सुरू असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.सोमवारी उत्तमनगर परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने धुमाकूळ घालत दोन-तीन बालकांना चावे घेऊन जखमी केले होते. नागरिकांनी महापालिकेला कळविल्यानंतर तातडीने डॉग व्हॅन पाठविण्यात येऊन पिसाळलेले श्वान जेरबंद करण्यात आले आहे. सदर श्वान पिसाळलेले आहे किंवा नाही, यावर डॉक्टरांचे पथक नजर ठेवून आहेत. सध्या श्वान निर्बिजीकरणासाठी तीन विभागांकरिता एक डॉग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्च २०१७ पासून त्यासाठी नव्याने ठेका काढण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्यात २२४ श्वानांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचेही डॉ. डेकाटे यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.