बदलत्या वातावरणामुळे वाढले पित्तविकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:46 AM2019-10-14T01:46:28+5:302019-10-14T01:47:44+5:30

आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या ऋतुमान बदलाच्या प्रक्रियेबरोबरच साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: या काळात उष्णतेचे विकार मोठ्या प्रमाणात बळावतात त्यामुळे पित्ताचे विकार, मळमळणे आणि तोंड येण्याच्या प्रकारात वाढ होत असते. शहरात सध्या खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Biliary disorders increased due to changing environment | बदलत्या वातावरणामुळे वाढले पित्तविकार

बदलत्या वातावरणामुळे वाढले पित्तविकार

Next
ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ : उष्णतेचे विकार बळावण्याचा काळ

नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या ऋतुमान बदलाच्या प्रक्रियेबरोबरच साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: या काळात उष्णतेचे विकार मोठ्या प्रमाणात बळावतात त्यामुळे पित्ताचे विकार, मळमळणे आणि तोंड येण्याच्या प्रकारात वाढ होत असते. शहरात सध्या खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
हिवाळ्यापूर्वीचा शरद ऋतू सुरू झाला असून, हिवाळ्याची चाहूलही लागली आहे. बदलत्या ऋतुमानाच्या उंबरठ्यावरचा हा काळ असल्याने या काळात आॅक्टोबरच्या हिटमुळे उष्णतेशी संबंधित विकाराची लागण लागलीच होत असते. त्यामुळे या दिवसांत शक्यतो पित्तविकार, तोंड येणे, मळमळणे, पोटात मुरडा मारून येणे असे अनेक विकार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे अशाप्रकारच्या रुग्णांचे प्रमाण खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्येदेखील दिसून येत आहे.
हिवाळा सुरू होण्यापूर्वीचा शरद ऋतू आणि हिवाळ्यानंतरचा हेमंत ऋतू हे दोन परस्पर ऋतुमान असल्याने त्याचा मानवी आहार आणि विहारावर परिणाम होत असतो. लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींनाही या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे.
शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे वाढलेले पित्त, त्यामुळे डोके गरगरणे आणि चक्कर येऊन पडण्याचे प्रकार घडले आहेत. हा प्रकार केवळ ऋतुमान बदलाचा असल्याने रुग्णांनी वेळीच योग्य ते औषधोपचार करवून घेणे अपेक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अशी घ्यावी काळजी
तिखट, आंबट, खारट पदार्थ बंद करावेत.
४ मसालेदार पदार्थांचे अतिसेवन टाळावेत.
४ आहारात फळभाज्यांचा वापर वाढवावा.
४ ज्वारीची भाकरी उत्तम.
४आहारात गायीचे तूप वापरावे.
४डाळिंब, नारळ, काळी मनुके, खजूर खावीत.
४ पुरेशी झोप घ्यावी. ४ जेवणानंतर लगेच झोपू नये.

Web Title: Biliary disorders increased due to changing environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.