शहरातून रिक्षासह दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:01 IST2018-11-20T01:00:44+5:302018-11-20T01:01:31+5:30

शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी रिक्षासह दुचाकी चोरून नेली आहे़ पंचवटी व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 Biking with auto rickshaw from the city | शहरातून रिक्षासह दुचाकीची चोरी

शहरातून रिक्षासह दुचाकीची चोरी

नाशिक : शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी रिक्षासह दुचाकी चोरून नेली आहे़ पंचवटी व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  आडगाव नाका परिसरातील रहिवासी सुनील सूर्यवंशी (३४ रा. श्रीहरी बंगला, पंचवटी) यांची दीड लाख रुपये किमतीची बजाज कंपनीची आॅटो रिक्षा (एमएच १५, एफ यू ९९००) संशयित अजय मराठे (२२, रा़ विजयनगर कॉलनी, आडगाव नाका, पंचवटी) याने वालझाडे मंगल कार्यालयाजवळील महिंद्रा बंगला येथून शुक्रवारी (दि़१६) चोरून नेली़ या प्रकरणी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, संशयित अजय मराठे यास अटक केली आहे.
वाहन चोरीची दुसरी घटना सातपूर - शिवाजीनगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात घडली़ मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील रहिवासी प्रवीण महाजन यांची दहा हजार रुपये किमतीची सीडी डिलक्स दुचाकी (एमएच १५, बीवाय ०९८६) चोरट्यांनी मालकर विहार येथून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Biking with auto rickshaw from the city