ओव्हरटेकच्या नादात धडक, दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 01:14 IST2021-03-25T23:09:32+5:302021-03-26T01:14:05+5:30
वणी : वणी पिंपळगाव रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने ओव्हरटेकच्या नादात चुकीच्या बाजूला जाऊन ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला.

ओव्हरटेकच्या नादात धडक, दुचाकीस्वार ठार
वणी : वणी पिंपळगाव रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने ओव्हरटेकच्या नादात चुकीच्या बाजूला जाऊन ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला.
प्रेमनाथ तिलकराम चौधरी (३४) व सुनील शामदेव उर्फ बनिया गुप्ता (१८, राहणार- महाराज गंज, जिल्हा कपीलवस्तु, नेपाळ. हल्ली राहणार विशाखा कंपनीजवळ पिंपळगाव बसवंत) हे दोघे दुचाकीवरून (एम. एच. १५-बीए ६२०८) वणी पिंपळगाव रस्त्यावरून जात असताना ओव्हरटेकच्या नादात समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला चुकीच्या बाजूला जाऊन धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात प्रेमनाथ गंभीर जखमी झाला.
प्राथमिक उपचारानंतर नाशिकला अधिक उपचारासाठी हलविले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत व समवेत असलेल्याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी या कारणावरून मृत पावलेल्या प्रेमनाथ चौधरी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.