कळवणला भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा

By Admin | Updated: September 3, 2016 23:35 IST2016-09-03T23:34:51+5:302016-09-03T23:35:15+5:30

जय्यत तयारी सुरु : पाच हजार भक्त सहभागी होणार

Bhagwat Story Gnan Vidhi Sawal | कळवणला भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा

कळवणला भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा

कळवण : मथुरानिवासी युगप्रवर्तक क्रांतिकारी राष्ट्रीय संत श्री श्री १००८ महामंडलेश्वर इंद्रदेव महाराज यांच्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याचे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची जय्यत तयारी सुरू आहे.
इंद्रदेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ५ सप्टेंबरपासून या सोहळ्यास कळवण येथील शिवाजीनगर भागातील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळील प्रांगणात प्रारंभ होत आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी
सुरू झाली असून, यासाठी धुळे येथील कारागिरांकडून मंडप उभारला जात आहे. २० हजार क्वेअर फुटाच्या प्रांगणात हा सोहळा रंगणार आहे. सोहळ्यात कळवण व पंचक्र ोशीतील चार ते पाच हजार भाविक
सहभागी होणार असल्याने जय्यत तयारी सुरु झाली आहे. सप्ताहा दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ सप्टेंबरपर्यंत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ उत्साहात साजरा होणार आहे. मथुरानिवासी युग प्रवर्तक क्र ांतिकारी राष्ट्रीय संत श्री श्री १००८ महामंडलेश्वर इंद्रदेव महाराज हे आपल्या मधुर व अमृतवाणीतून श्रीमद्भागवत कथा सांगणार आहे. दि. ५ ते १० सप्टेंबरपर्यंत रोज रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान श्रीमद्भागवत
कथेचे वाचन केले जाणार आहे. दि.५ सप्टेंबर रोजी भागवत महात्म्य, दि. ६ - सती दक्ष यज्ञ विध्वंस, दि. ७ - श्री नरसिंह अवतार व श्री दत्तगुरू अवतार, दि.८ - श्रीकृष्ण जन्मोत्सव, दि. ९- श्रीकृष्ण बाललीला, दहीहंडी उत्सव व रासलीला, दि. १०- गोवर्धन पूजन, परिक्षित मोक्ष व भागवत पोथी दर्शन आदि कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी श्रीमद्भागवत कथा समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गजानन सोनजे व यतीन सोनजे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Bhagwat Story Gnan Vidhi Sawal