बीए, बीकॉमच्या आॅनलाइन प्रवेशाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:13 IST2020-07-24T23:23:35+5:302020-07-25T01:13:28+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्तअध्ययन प्रशालेमार्फ त प्रथम वर्ष बी.ए. आणि बी.कॉम. या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दूरस्थ किंवा बहिस्थ शिक्षणपद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शुक्रवार (दि.२४) दुपारी तीन वाजल्यापासून राबविली जाणार असून, मुक्तअध्ययन प्रशाळेच्या संकेत स्थळावर सुरू करण्यात आली आहे.

Beginning of online access to BA, BCom | बीए, बीकॉमच्या आॅनलाइन प्रवेशाला सुरुवात

बीए, बीकॉमच्या आॅनलाइन प्रवेशाला सुरुवात

ठळक मुद्दे३१ आॅगस्टपर्यंत मुदत : बहिस्थसाठी संधी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्तअध्ययन प्रशालेमार्फ त प्रथम वर्ष बी.ए. आणि बी.कॉम. या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दूरस्थ किंवा बहिस्थ शिक्षणपद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शुक्रवार (दि.२४) दुपारी तीन वाजल्यापासून राबविली जाणार असून, मुक्तअध्ययन प्रशाळेच्या संकेत स्थळावर सुरू करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार ‘प्रथम प्रवेश घेणाºयास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत आॅनलाइन पद्धतीने पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील केंद्रांवर प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुक्त अध्ययन प्रशाळेचे निवडक महाविद्यालयांमध्ये अभ्यास केंद्र असून, या अभ्यास केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रक्रिया करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइनपद्धतीने प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

Web Title: Beginning of online access to BA, BCom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.