नाशिकमध्ये दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:38 IST2018-08-28T15:32:31+5:302018-08-28T15:38:19+5:30

प्रथम भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रमथ भाषेचा पेपर दिला. जिल्ह्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीं २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान ही पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत असून जिल्हाभरातील विविध शाळांना या परीक्षांसाठी २८ लाख ३० हजार १०० प्रश्नपत्रिकांचे शाळांना वाटप करण्यात आले आहे. 

Beginning of the basic test of second to eighth students in Nashik | नाशिकमध्ये दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीला सुरुवात

नाशिकमध्ये दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीला सुरुवात

ठळक मुद्देनाशिकमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात दुसरीपासून आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांची परीक्षाशाळांना २८ लाख ३० हजार १०० प्रश्नपत्रिकांचे वाटप

नाशिक : प्रथम भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवारपासून (दि.२८) सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रमथ भाषेचा पेपर दिला. जिल्ह्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीं २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान ही पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत असून जिल्हाभरातील विविध शाळांना या परीक्षांसाठी २८ लाख ३० हजार १०० प्रश्नपत्रिकांचे शाळांना वाटप करण्यात आले आहे. 
विद्यार्थ्यांची भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांमधील गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणी दरवर्षी घेतली जाते. यंदाही दुसरीसाठी प्रथम भाषा व गणित या विषयांवर, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा व इंग्रजी या विषयांवर व  सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, विज्ञान व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांसाठी परीक्षा होणार आहेत. त्यातील इयत्ता दुसरी ते आठवीची प्रथम भाषा चाचणी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात आली. तर गणित विषयाची चाचणी बुधवारी (दि.२९)  होणार आहे. त्यानंतर तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची चाचणी गुरुवारी (दि.३०) व सहावी ते आठवीच्या विद्याथ्यार्ची विज्ञान या विषयाची चाचणी शुक्रवारी (दि.३१) होणार आहे. चाचणी झाल्यावर एक आठवड्याच्या कालावधीनंतर शाळांना पेपर तपासणी पूर्ण करणे बंधनकारक असून ‘महास्टुडण्ट अ‍ॅप’च्या माध्यमातून गुण भरण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Beginning of the basic test of second to eighth students in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.