शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे मतमोजणीप्रकिया शांततेत

By admin | Updated: May 17, 2014 00:34 IST

शहरात शांततामय वातावरण : अनुचित घटना नाही

शहरात शांततामय वातावरण : अनुचित घटना नाहीनाशिक : पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केलेल्या यशस्वी पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनामुळे लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली़ या प्रक्रियेनंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली़ या दोन्ही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये निकालाबाबत कमालीची उत्सुकता होती़ त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्या होणार्‍या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी एक दिवस अगोदरपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ मतमोजणीदरम्यान उमेदवारांच्या मतांच्या आघाडी-पिछाडीदरम्यान विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक राजकीय पक्षाच्या वाहनासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था तसेच त्यांना उभे राहण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली होती़ मतमोजणीच्या ठिकाणी ओळखपत्रधारकाव्यतिरिक्त कोणीही जाणार नाही, याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली़ लोकसभा मतदानाच्या दिवशी झालेले पोलीस कर्मचार्‍यांचे हाल मतमोजणीच्या दिवशी मात्र झाले नाही़ सेंट्रल वेअर हाऊसच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, बॅरेकेडिंग तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तंबूची उभारणी करण्यात आली होती़ पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त डॉ़ डी़एस़ स्वामी, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, हेमराजसिंह राजपूत हे मतमोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून होते़ शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी शहरातील पक्षांची कार्यालये तसेच रस्त्यांवर चांगला बंदोबस्त तैनात केला होता़ त्यामुळे शहरात कुठेही अनुचित घटना घडली नाही़ दरम्यान, मतमोजणीप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़१८ मेनंतर विजयी मिरवणुका लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांना विजयी मिरवणूक काढावयाची असल्यास दोन दिवस वाट पहावी लागणार आहे़ १८ मेनंतर मिरवणुकीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली़