सुरक्षा रक्षाकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:14 IST2020-08-29T23:22:28+5:302020-08-30T01:14:21+5:30
नाशिक : रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकास तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षाकास मारहाण
ठळक मुद्देयाप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत.
नाशिक : रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकास तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान रमेश देवरे (३२, रा. सिडको) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि. २८) रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीवरून तीन संशयित उडी मारून रुग्णालयीन परिसरात शिरत होते. त्यामुळे देवरे यांनी तिघांनाही हटकले असता त्याचा राग आल्याने संशयितांनी देवरे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत.