शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वतयारीवरच कुंभमेळ्याचे यश अवलंबून

By admin | Updated: July 31, 2014 00:53 IST

कृष्णकांत भोगे : तीन वर्षे अगोदर नियोजन करणे गरजेचे

नाशिक : कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन करायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन हवे. यापूर्वी म्हणजेच २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी मी २००० मध्येच तयारी सुरू केली होती. साहजिकच कुंभमेळा प्रत्यक्ष सुरू होण्याच्या आत कामे पूर्ण झाली. त्यामुळेच गेल्या कुंभमेळ्यात कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नव्हत्या. आता मात्र एकूणच तयारीला विलंब झाल्याचे दिसत आहे, असे मत बारा वर्षांपूर्वीच्या कुंभमेळ्याची तयारी करणारे महापालिकेचे माजी आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी व्यक्त केले.२००३-०४ या कालावधीत नाशिकमध्ये कुंभमेळा संपन्न झाला. त्यावेळी कृष्णकांत भोगे यांनी नियोजन केले होते. १ मे २००० रोजी महापालिकेची सूत्रे स्वीकारणाऱ्या भोगे यांनी कुंभमेळ्याची तयारी केली आणि त्यानंतर ११ एप्रिल २००३ मध्ये बदली झाली आणि त्यानंतर विमलेंद्र शरण यांनी सूत्रे स्वीकारली होती. गेल्या कुंभमेळ्यात अडचणी उद्भवल्या नसल्याचे साधू-महंत सांगतात. तथापि, गेल्यावेळी कुंभमेळ्याची वेळेत झालेली कामे आणि त्यासाठी निधीची उपलब्धता यामुळेच कुंभमेळा यशस्वी झाल्याचे भोगे सांगतात.कुंभमेळा म्हटला की तीन ते चार महत्त्वाचे टप्पे आहेत. कुंभमेळ्यासाठी साधू-महंत येतात. त्यापेक्षा कैकपटीने अधिक भाविक येतात. त्यामुळे या भाविकांसाठी रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा देणे, त्यानंतर साधू-महंतांच्या तीन महिने कालावधीसाठी साधुग्राम तयार करणे, तसेच त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियोजन आणि महत्त्वाचे गोदावरी पात्राचे नियोजन करणे ही कामे असतात. मी नाशिकची सूत्रे स्वीकारली तेव्हा कुंभमेळा तीन वर्षांनी होणार होता. तथापि, अगोदरच तयारी सुरू केली होती. कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे काम असो अथवा बांधकाम, ही कामे करण्यासाठी किमान एक वर्ष कालावधी लागतो आणि त्याच कामांसाठी निविदा काढायचे म्हटले तर किमान सहा महिने इतका कालावधी प्रक्रिया राबविण्यासाठी लागतो. कित्येकदा फेरनिविदा मागवाव्या लागतात. त्याचा विचार केला तर पूर्वतयारीच आवश्यक असते. कुंभमेळ्याची तयारी करताना मी वेळापत्रकच आखून घेतले होते. त्यामुळे कोणतेही काम करताना अडचण आली नाही. सगळी कामे वेळेत पूर्ण करता आली. अगदी साधुग्रामसाठी जागा वेळेत घेतल्याने त्याठिकाणी येणाऱ्या साधूंना भूखंड देण्यापासून सर्व नियोजन करता आल्याचे त्यांनी सांगितले.