शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बीएपीएसचा जगाच्या कल्याणासाठी विश्वशांती महायज्ञ; प्रार्थना व मंत्रोच्चाराने मूर्तींना देवत्व प्राप्त - महंत स्वामी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 08:33 IST

यावेळी चारही वेदांचे पठण करण्यात आले. यज्ञ हा एक पवित्र वैदिक विधी असून या दरम्यान सहभागी हरिभक्तांकडून संस्कृत मंत्रांचा जप केला जातो, म्हणून यज्ञ अग्नीत अर्पण करतात.

राजू ठाकरे -नाशिक : पंचवटीतील स्वामीनारायण मंदीरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव सुरू असून प्राणप्रतिष्ठा महोत्सवांतर्गत आज (दि. २६) जगात शांती प्रस्थापित व्हावी, देश प्रगतशील बनावा, भारताच्या सर्व राज्यांत एकता व बंधुता कायम नांदावी याउद्देशाने जगाच्या कल्याणासाठी विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी चारही वेदांचे पठण करण्यात आले. यज्ञ हा एक पवित्र वैदिक विधी असून या दरम्यान सहभागी हरिभक्तांकडून संस्कृत मंत्रांचा जप केला जातो, म्हणून यज्ञ अग्नीत अर्पण करतात. यज्ञा दरम्यान केल्या जाणार्‍या प्रार्थना व मंत्रोच्चाराने मंदिरात स्थापित केल्या जाणार्‍या मूर्तींना देवत्व प्राप्त होते आणि सहभागी भक्तांनाही मानसिक शांती, समृद्धी यांसह कौटुंबिक सौहार्द मिळते. बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराच्या मैदानावर आठवडाभर चालणाऱ्या उत्सवाच्या स्मरणार्थ आयोजित विश्वशांती महायज्ञ कार्यक्रमात प्रकट ब्रम्हस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी उपस्थितांना आशिर्वादपर शुभेच्छा दिल्या. 

समारंभाचे अध्यक्षस्थान पूज्य भक्तीप्रियदास स्वामी, पूज्य विवेकसागरदास स्वामी, पूज्य त्यागवल्लभदास स्वामी, पूज्य घनश्यामचरणदास स्वामी, पूज्य महाव्रत दास, पूज्य श्रृतीप्रकाश दास, ईश्वरचरण दास, यांनी भूषविले तर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व त्यांच्या पत्नी भारती गमे यांनी देखील विश्वशांती महायज्ञात सहभाग नोंदवला. 

विश्वशांती महायज्ञात शेकडो भाविकांची हजेरी -- बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराच्या मैदानावर आयोजित विश्वशांती महायज्ञ सोहळ्यात नाशिक, पुणे, धुळे, जळगाव ,औरंगाबाद अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हरिभक्तांसह गुजरात मुबई, पुणे, खानदेश आदी भागातील शेकडो भाविक सहभागी. - स्वामीनारायण मंदिरांच्या माध्यमातून संस्कृती, नात्यांतील गोडवा यांसह ह्रूणामुबंध जोसण्याचे कार्य.- महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात स्वामीनारायण मंदिराचे निर्माण व्हावे हा बीएपीएसचा संकल्प.

उद्या मंगळवार (दि. २७) विश्वशांती महायज्ञ व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून बुधवारी (दि. २८) महोत्सवातील मुख्य वेदोक्त मूर्ती प्रतिष्ठाविधी सोहळा.

 

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर