शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 07:45 IST

Iran Protests: इराणच्या चलनाचे (रियाल) मूल्य ऐतिहासिक निचांकी पातळीवर घसरल्याने तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

तेहरान: इराणमध्ये वाढती महागाई, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि इस्लामिक राजवटीच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या निदर्शनांमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत किमान ३५ आंदोलकांचा मृत्यू झाला असून १२०० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

इराणच्या चलनाचे (रियाल) मूल्य ऐतिहासिक निचांकी पातळीवर घसरल्याने तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तेहरानच्या बाजारपेठेतून आर्थिक प्रश्नांवर सुरू झालेले हे आंदोलन आता राजकीय आंदोलनात रूपांतरित झाले आहे. आंदोलक आता थेट सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजीनाम्याची आणि इस्लामिक सत्ता संपवण्याची मागणी करत आहेत. २०२२ मधील महसा अमिनी प्रकरणांनंतरचे हे सर्वात मोठे आणि व्यापक आंदोलन असल्याचे मानले जात आहे.

सुरक्षा दलांकडून अमानुष छळमानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, इराणच्या ३१ पैकी २७ प्रांतांमध्ये ही आंदोलने पसरली आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी थेट गोळीबार आणि जड शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी आंदोलकांना 'परकीय एजंट' आणि 'दंगलखोर' संबोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. इराण सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर सुरू केला आहे. इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आले असून अनेक शहरांमध्ये लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुण आणि महिलांची संख्या मोठी आहे. मानवाधिकार संघटनांनी इराणमधील या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून, अटकेत असलेल्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Protests Escalate: Military Action Kills 35, Over 1200 Arrested

Web Summary : Iran's protests against economic hardship and the Islamic regime turned violent. Security forces killed at least 35, arresting over 1200, including women and youth. Demonstrators demand the Supreme Leader's resignation amid rising prices and widespread discontent, marking the largest unrest since 2022.
टॅग्स :Iranइराण