शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 8:48 PM

काही महिन्यांपुर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांग्लादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जीवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ‘बुरखा’ फाडला.

ठळक मुद्देसलमाला भारतात मावशीने आणले नानीकडे पोहचविल्यानंतर दोन दिवस पिडितेसोबत बलात्कार वेश्या व्यावसायाला ‘खाकी’चे उघड संरक्षण असल्याचा प्रकार सिन्नरमध्ये उघडकीस

नाशिक :वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला सुपूर्द केले. यानंतर पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला आणि काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात देहविक्रयासाठी विकले गेले.कोलकातामधील एका ग्रामीण भागात देहव्यापार बळजबरीने करून घेतला जात असताना मुलीने जीव मुठीत धरून त्या नरकसमान बाजारातून बाहेर उडी घेत पलायन केले. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांगलादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जिवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ‘बुरखा’ फाडला.देहविक्रयसाठी प्रवृत्त करत बळजबरीने नरकात ढकलणा-या त्या पीडित मुलीला शोधून सुखरूपपणे बांगलादेशात पोहोचविण्याचा त्यावेळी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांनी केलेला दावा अखेर जीव मुठीत धरत त्या मुलीने नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांकडे घडलेली हकिगत सांगून फोल ठरविला. या प्रकारामुळे सिन्नर पोलीसही सेक्स रॅकेट प्रकरणात गुंतल्याचे समोर येत असून पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. वेश्या व्यावसायाला ‘खाकी’चे उघड संरक्षण असल्याचा प्रकार सांगलीनंतर नाशिकच्या सिन्नरमध्ये उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. या दोघांना पोलीस अधिक्षकांकडे सोपविले गेले आहे. कारण या दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे सलमाने सांगितले.अवैधरीत्या जंगलाच्या मार्गातून ‘बॉर्डर क्रॉस’ करण्यास प्रवृत्तअल्पवयीन  मुलीला बांग्लादेशामधून फसवून तिच्या मावशीने भारतात आणले; मात्र तेदेखील अवैधरित्या. मुलीने प्रसारमाध्यमांसमोर हा धक्कादायक खुलासा केला आहे. भारत-बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेल्या जंगलातून नदीच्या मार्गे सलमाला भारतात मावशीने आणले आणि नाशिकच्या एका दलालाला सोपविले. त्यानंतर त्या दलालाने त्या बालिकेला साधारण वर्षभरापूर्वी सिन्नरच्या ‘नानी’च्या दलालालाकडे सुपुर्द केले. 'नानी'कडे पोहचविल्यानंतर दोन दिवस पिडितेसोबत बलात्कार केल्यानंतर तिला मुंबईकडे एका महिलेला विकले गेले. तेथून कोलकाताला विकले गेले. कोलकाताला पोलिसांनी अटक केल्यानंतर तेथे महिला दलालाने ५० हजार रुपये देऊन सुटका करून घेत कोलकात्याच्या वेश्या बाजारात विकले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेsex crimeसेक्स गुन्हा