बद्रिनाथला अडकले नाशिकचे भाविक

By Admin | Updated: July 2, 2015 00:21 IST2015-07-02T00:16:52+5:302015-07-02T00:21:15+5:30

बद्रिनाथला अडकले नाशिकचे भाविक

Badrinath gets stuck in Nashik | बद्रिनाथला अडकले नाशिकचे भाविक

बद्रिनाथला अडकले नाशिकचे भाविक

नाशिकरोड : बद्रिनाथ येथे श्रीमद्भागवत कथेकरिता गेलेले नाशिकचे शेकडो भाविक मुसळधार पावसामुळे अडकून पडल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे़ गेल्या काही दिवसांपासून बद्रिनाथ-केदारनाथमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे़ बद्रिनाथ येथे श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून नाशिक परिसरातून बहुसंख्य भाविक सहकुटुंब यासाठी गेले आहेत़ नाशिकरोड रेल्वे स्थानकचे माजी उपमहाप्रबंधक दिनेशचंद्र अग्रवाल, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख जेलरोडचे बाळासाहेब गाडगीळ यांच्यासह शहरातील अनेक कुटुंबे कथेसाठी गेले होते़ गत पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे बद्रिनाथ परिसराचा आजूबाजूच्या परिसराशी संपर्क तुटल्याने नाशिकसह इतर ठिकाणचे शेकडो भाविक अडकून पडले आहेत़ त्यामुळे बद्रिनाथहून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा ठप्प झाल्याने भाविक बद्रिनाथला अडकून पडले आहेत़ गुरुवारी दुपारनंतर सर्व भाविक तिथून सुखरुपपणे निघण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Badrinath gets stuck in Nashik