शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांकडून पत्रक वाटून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 17:35 IST

टाळेबंदीच्या काळात तरुणांचे रोजगार गेल्याने का काही लोक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात पत्रक वाटप करून व ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये स्वत:च्या व कुटुंबियांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देइंदिरानर, उपनगर परिसरात पोलिसांकडून जनजागृतीनागरिकांना गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन

नाशिक : शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुमारे दीड महिना कडेकोट टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात आली होते. त्यामुळे  अनेक तरुणांचे रोजगार गेले असून यातील काही लोक गुन्हेगारीकडे वळण्याची  शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात पत्रक वाटप करून व  ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये स्वत:च्या व कुटुंबियांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे.  टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि हाताला कामधंदा नसल्याने काही तरुण मंडळी गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  त्यामुळे शहरातील चेनस्नॅचिंग, चोरी, घरफोडी, जबरी चोरी, पोलिस असल्याची बतावणी करून लुटमार करणे व हातचालखी करून व संमोहीत करून दागीने चोरी करण्याच्या प्रकारांसह जनावरांची चोरी, घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंची चोरी, मोटारसायकल चोरी, बँकेत जाणाऱ्या येणाऱ्यांची लुटमार करून पैशांची चोरी, अंगावर कचरा फेकून पैसे चोरी करणे किंवा मोटारसायकल, चारचाकी वाहनातील पैसे चोरणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा घटनेचा धोका नागरिकांना तत्काळ लक्षात यावा व नागरिक अशा घटनांना बळी पडू नये, नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे त्याचप्रमाणे ऑनलाईन पेमेंट करताना खबरदारी घ्यावी अशा स्वरुपाची जनजागृती करण्यात येत आहे. तसेच  शेतकऱ्यांनी जनावरे व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी बांधून चोरी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात  इंदिरानगर ,उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत पोलीस असल्याचे सांगून चार तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व पोलिस उपायुक्त विजय खरात व  सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांचे मार्गदर्शनानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर व कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी सतर्क राहावे अशा आशयाचे जनजागृती पत्रक वाटप करून नागरिकांना सावध राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेThiefचोर