शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया पथकाकडून जागरूकता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:49 IST

महिला सुरक्षा आणि सुरक्षितता यावर येथील निर्भया पथकाच्या युनिट चारकडून नूतन विद्यामंदिर परिसरात शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येऊन निर्भयाबाबत माहिती देण्यात आली.

देवळाली कॅम्प : महिला सुरक्षा आणि सुरक्षितता यावर येथील निर्भया पथकाच्या युनिट चारकडून नूतन विद्यामंदिर परिसरात शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येऊन निर्भयाबाबत माहिती देण्यात आली.
महिला, तरुणी, शालेय विद्यार्थिनींवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी शहर पोलिसांनी निर्भया पथक सुरू केले आहे. आतापर्यंत देवळालीतील निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, हवालदार भास्कर कडाळे, सुधीर काकड, स्वाती फड, कल्पना बैरागी आदींनी खंडेराव टेकडीसह
विविध भागांत कारवाई आणि जनजागृती अशी दुहेरी भूमिका पार पाडली आहे.
याबाबत बोलताना निर्भया पथकाच्या पीएसआय वैशाली मुकणे यांनी सांगितले, निर्भया पथकाने वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसमधील १५ हजार विद्यार्थिनींना आजपावेतो मार्गदर्शन केले आहे. यामध्ये मुलींची स्वसुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असून, मुलींना त्याबाबत अवगत करण्यात आले आहे.
याशिवाय विविध भागांत जोडप्याने फिरणाऱ्या मुली व मुलांची समजूत काढून त्यांना घरी अथवा त्यांच्या संपर्क क्रमांक घेऊन सोडून देण्यात येत असते. निर्भया पथकाकडून मार्गदर्शन करण्याबरोबरच माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. टवाळखोरांबाबत अथवा छेडछाडीच्या घटनांबाबत माहिती द्यायची असल्यास नागरिकांनी १०९१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पथकाकडून करण्यात आले आहे.
धोका असा ओळखा
मुलींच्या वयोगटानुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून, १२ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श समजावून सांगितला जातो तसेच असा अनुभव असल्यास पालकांना त्याची कशी कल्पना द्यावी, त्याचबरोबर १४ ते १६ आणि १६ ते १८ या वयोगटांतील मुलींना आमिषांबाबत आणि त्यातून निर्माण होणाºया धोक्यांबाबत माहिती देण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थी