शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत ग्रामीण भागात जाणीव जागृती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

येवला : वैयक्तिक आरोग्य, मानसिक आरोग्य, कौटुंबिक आरोग्य व सामाजिक आरोग्य जपण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. सध्या ...

येवला : वैयक्तिक आरोग्य, मानसिक आरोग्य, कौटुंबिक आरोग्य व सामाजिक आरोग्य जपण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असून, ग्रामीण भागात लोकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. दीपक ठोंबरे यांनी केलेे.

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘कोविड-१९ व सामाजिक आरोग्य जाणीव जागृती’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानाप्रसंगी डॉ. दीपक ठोंबरे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.

कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज असून, नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर पाळले तर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आपल्याला थोपवता येईल. नियमित व्यायाम, सकस आहार यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. यामुळे कोरोनाला प्रतिबंध होऊ शकतो. कोरोनाचे लवकर निदान झाल्यास कोरोना निश्चित बरा होतो. कोरोनात मृत्युदर फक्त दोन किंवा तीन टक्के असल्याने भीती बाळगण्याचे कारण नाही. केवळ भीती बाळगल्याने अनेक रुग्ण दगावले असल्याचेही डॉ. दीपक ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी, कोरोना प्रतिबंधासाठी महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.

कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, डॉ. अरुण वनारसे, वैभव सोनवणे, देवीदास बागुल उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक साहाय्य लाभले. कार्यक्रमानंतर महाविद्यालय परिसरात महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ. निकम यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. प्रास्ताविक संयोजक डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. वसंत गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. कैलास बच्छाव यांनी केले.