जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने  ‘ग्राहक श्री’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:48 AM2018-12-25T00:48:56+5:302018-12-25T00:49:26+5:30

येथील जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने महापालिका हद्दीतील तीन जागरूक ग्राहक व ग्रामीण भागातील तीन जागरूक ग्राहकांना ‘ग्राहक श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Awarded 'Customer Shri' on behalf of District Client Panchayat | जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने  ‘ग्राहक श्री’ पुरस्कार प्रदान

जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने  ‘ग्राहक श्री’ पुरस्कार प्रदान

Next

नाशिक : येथील जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने महापालिका हद्दीतील तीन जागरूक ग्राहक व ग्रामीण भागातील तीन जागरूक ग्राहकांना ‘ग्राहक श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.  राष्टय ग्राहक दिनाच्या निमित्ताने गंगापूररोडवरील गीतांजली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक स्वाती भामरे उपस्थित होत्या. दरम्यान, जादा वीज देयक दर रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या डॉ. केतन मर्चंट, देवकिसन भुतडा, सुरेश रंगदळ तसेच ग्रामीण भागातील आबाजी बारे, संजय मानकर, रेवती बोरसे यांना ग्राहक पंचायतीच्या वतीने मानचिन्ह देऊ गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वीज ग्राहक गाºहाणे न्याय मंचाच्या सहन्यायाधीश वैशाली देवळे, पंचायतीचे अध्यक्ष सुहासिनी वाघमारे, विलास देवळे उपस्थित होते.  यावेळी भामरे यांनी ग्राहक कायदा व लोकसभेतील नवीन प्रभावी कायदा दुरुस्तीची माहिती दिली. अन्यायकारक वागणुकीविरुद्ध ग्राहकांनी आपल्या न्यायहक्कांसाठी संघर्ष करत लढा उभारणे गरजेचे आहे. जागरूक नागरिक म्हणून ते कर्तव्य असल्याचे भामरे म्हणाले.

Web Title: Awarded 'Customer Shri' on behalf of District Client Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.