शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या ४९ गाळ्यांचे लिलाव रद्द

By admin | Updated: October 18, 2014 00:33 IST

पोलिसांचा नकार : तीन विभागांत ३१ ठिकाणी विरोध

नाशिक : महापालिकेने फटाके विक्रीच्या गाळ्यांसाठी १६० गाळ्यांचे लिलाव जाहीर केले होते; परंतु गुरुवारी १८, तर शुक्रवारी ३१ अशा प्रकारे ४९ गाळ्यांच्या जागांना पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे लिलाव रद्द करण्यात आले आहेत. त्याचा पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी ज्या जागांवर गाळे होते तेथेही पोलिसांनी नकार दिला आहे.दिवाळीसाठी अधिकृत म्हणून १६० गाळ्यांचे लिलाव पालिकेने जाहीर केले होते. त्यापैकी नाशिक, पूर्व आणि पश्चिमसाठी गुरुवारी लिलाव झाले; परंतु त्यातील १८ गाळ्यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ते रद्द करण्यात आले. शुक्रवारी सातपूर, सिडको आणि नाशिकरोड विभागातील गाळ्यांचे लिलाव घोषित करण्यात आले होते; परंतु नाशिकरोडच्या बिटको चौकातील २२, जेलरोड पोलीस चौकीजवळील आणि सातपूर विभागातील शिवाजीनगर येथील एक असे ३१ गाळ्यांचे लिलाव पोलिसांनी हरकत घेतल्याने रद्द करण्यात आले. त्यामुळे उर्वरित गाळ्यांचे लिलाव करण्यात आले. एकूण १६० पैकी ४९ गाळ्यांचे लिलाव रद्द झाल्याने पालिकेला दहा दिवसांसाठी मिळणाऱ्या काही लाख रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागणार आहे. वास्तविक पालिकेने गाळ्यांसाठी जागानिश्चिती करताना पोलिसांच्या बरोबरीने अथवा पूर्वपरवानगी घेतली असती आणि त्यांनतर लिलाव काढले असते तर ते रद्द करण्याची वेळ आली नसती. आता ऐनवेळी नवीन ठिकाणी गाळे उभारणीसाठी जागा निश्चित करून परवानगी घेणे जिकिरीचे जाणार असून, व्यावसायिकही त्यासाठी कितपत तयार होतील याविषयी शंकाच आहे. (प्रतिनिधी)