सटाण्यात गुणवंतांचा सत्कार

By Admin | Updated: April 6, 2017 00:53 IST2017-04-06T00:53:01+5:302017-04-06T00:53:13+5:30

सटाणा : गोराणे येथील भूषण अहिरे, सचिन सोळुंके, तुषार सोनवणे आदि यशस्वी विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Attend the quality in the center | सटाण्यात गुणवंतांचा सत्कार

सटाण्यात गुणवंतांचा सत्कार

सटाणा : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या गोराणे येथील भूषण अहिरे, सचिन सोळुंके, तुषार सोनवणे आदि यशस्वी विद्यार्थ्यांचा येथील पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मातृभाषेत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या सामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्यांनी बागलाणचे नाव देश पातळीवर उंचावण्याचे काम केले असल्याचे मत व्यक्त करून यावेळी नगराध्यक्ष मोरे म्हणाले की, यापूर्वी आपण शहरात आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिराच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात विद्यार्थ्यांना करिअर तसेच स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर आदि विषयांवर मार्गदर्शन करणारे उपक्र म राबविणार असल्याचे सांगितले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सत्कारार्थीनी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या सारख्या देवत्व प्राप्त झालेल्या लोकाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आदर्श जोपासण्याचे आवाहनही मोरे यांनी केले.
यावेळी भूषण अहिरे, सचिन सोळुंके, मुख्याधिकारी हेमलता डगळे, नगरसेवक महेश देवरे, डॉ. विद्या सोनवणे, यशवंत कात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Web Title: Attend the quality in the center