राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; खासदार संजय राऊत यांचा आरोप

By संजय पाठक | Updated: May 16, 2023 23:04 IST2023-05-16T23:03:56+5:302023-05-16T23:04:25+5:30

नाशिकमध्ये एका कार्यक्रमात आले असताना राऊतांनी डागली तोफ

Attempts to create government-sponsored riots in the state; Allegation of MP Sanjay Raut | राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; खासदार संजय राऊत यांचा आरोप

राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; खासदार संजय राऊत यांचा आरोप

संजय पाठक, नाशिक: देशात अस्थिरता आणि तणाव  निर्माण करण्याची फॅक्टरी तयार आहे त्याची प्रयोगशाळा म्हणून महाराष्ट्रात तणाव निर्माण केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

"अकोला शेवगावच नव्हे तर सर्वत्र जाणीवपूर्वक दंगल करून तणाव निर्माण केला जात आहे राज्यात भविष्यात सत्ता आणण्यासाठी अशा प्रकारचे तणाव वातावरण निर्माण केले जात आहे आणि याच विषयावर पुन्हा मते मागितली जाणार आहेत", असे राऊत म्हणाले. कर्नाटक- मणिपूर यासारख्या ठिकाणी भाजपचे सरकार असताना तणाव निर्माण झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदू मुस्लिम आणि मागासवर्गीय गुण्यागोविंदाने राहत होते असे ते म्हणाले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिक मध्ये एका वादग्रस्त विधानासंदर्भात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता या संदर्भात संजय राऊत यांनी अटकपूर्व जामीन देखील आज मिळवला आहे.

Web Title: Attempts to create government-sponsored riots in the state; Allegation of MP Sanjay Raut