अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 00:46 IST2021-11-19T00:45:47+5:302021-11-19T00:46:10+5:30
सकाळच्या सुमारास निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील भाऊसाहेब सखाहरी साबळे या युवकाने विंचूर येथे गुरुवारी (दि.१८) अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखत लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.

अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
विंचूर: सकाळच्या सुमारास निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील भाऊसाहेब सखाहरी साबळे या युवकाने विंचूर येथे गुरुवारी (दि.१८) अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखत लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.
डोंगरगाव येथील भाऊसाहेब साबळे याने शेतरस्त्याचा वाद व राजकीय कारणामुळे विंचूर तीनपाटी वरील पोलीस औट पोस्टसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणाच्या अंगावर पाणी फेकले व त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. भाऊसाहेब साबळे यास ताब्यात घेऊन लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. येथील वर्दळीच्या भागात अंगावर पेट्रोल ओतल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्यावतीने संबंधितांवर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.