सिडको : सिडकोतील महाकाली चौकात शुक्रवारी सकाळी मोकाट जनावरांनी सातवर्षीय बालकासह वृद्ध महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश पवार हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर याच भागात सीताबाई ठाकरे या वृद्ध महिलेवरदेखील मोकाट जनावरांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.साईबाबानगर येथे राहणारे शरद पवार यांचा एकुलता एक सात वर्षीय मुलगा महेश यास त्याची आई शीतल पवार या शुक्रवारी (दि.४) सकाळी ७ वाजेच्या सुमारास पवननगर येथील हिरे विद्यालयात शाळेत सोडण्यासाठी जात असताना साईबाबानगर येथील महाकाली चौकात ठिय्या मांडून बसलेल्या मोकाट जनावरांच्या कळपाने अचानक हल्ला करून महेशला जखमी केले.
मोकाट जनावरांचा बालकासह वृद्धेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 02:11 IST
सिडकोतील महाकाली चौकात शुक्रवारी सकाळी मोकाट जनावरांनी सातवर्षीय बालकासह वृद्ध महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश पवार हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर याच भागात सीताबाई ठाकरे या वृद्ध महिलेवरदेखील मोकाट जनावरांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मोकाट जनावरांचा बालकासह वृद्धेवर हल्ला
ठळक मुद्देसिडकोतील घटना : मुलाची प्रकृती चिंताजनक