संगमेश्वरातील पवननगर येथे १५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२० दरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणीने आई-वडिलांना हकीगत सांगून शनिवारी (दि.६ ) याबाबत पोलिसात फिर्याद दिली. सुमित बाळूसिंग परदेशी (२५) रा. पवननगर, पवन परदेशी, शोभा परदेशी, विकी भावसार, राजू शिंदे सर्व रा. मालेगाव यांचे विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सुमित परदेशी याने फिर्यादीशी फोनवर संपर्क साधून विकी भावसार व राजू शिंदे यांच्या सहकार्याने फिर्यादीस फोनवर झालेले व्हॉट्सॲप संदेश तुझ्या नातेवाइकांना दाखवून तुझी बदनामी करेल, असे धमकावून तिच्याशी लग्न केले. तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीने आईच्या घरी जाण्याबाबत सांगितले असता सुमित, पवन व शोभा परदेशी यांनी शिवीगाळ व मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
तरुणीवर अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST