सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:12 IST2019-11-18T14:10:13+5:302019-11-18T14:12:36+5:30
मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली.

सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला
नाशिक : नोकरीच्या शोधात उत्तरप्रदेश राज्यातून शहरात भटकंती करत गोदाकाठावर वास्तव्य करणाऱ्या एका तरूण परप्रांतीय चोरट्याने रविवारकारंजा येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या एटीएम केंद्रात जाऊन सोमवारी (दि.१८) मध्यरात्री एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र गस्तीवर असलेल्या बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संशयित सनी रावत (१९) यास बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. यामुळे यंत्राचा पत्रा कापला केलो; परंतू आतमध्ये असलेल्या रोकडच्या ट्रेपर्यंत त्याला पोहचता आले नाही.