शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सहायक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

By admin | Updated: December 31, 2016 23:21 IST

मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अधीक्षकाविरोधात विद्यार्थिनींचा एल्गार

कळवण : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत मानूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील ९० विद्यार्थिनींनी दमबाजी करणाऱ्या महिला अधीक्षकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून निवेदन दिले.  प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांनी दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुलींनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. वसतिगृहात पथक पाठवून चौकशी करण्यात आली असून, संबंधित महिला अधीक्षकास नोटीस देण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील मानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या अधीक्षकाविरोधातील विद्यार्थ्यांच्या  तक्रारीची सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी दखल घेतल्यानंतर शनिवारी कळवण शहराजवळील मानूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील ९० मुलींनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या मांडून महिला अधीक्षकाविरोधात एल्गार पुकारल्याने आदिवासी प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली आहे.
शासनाने कोट्यवधी रु पये खर्च करून मानूर येथे सर्व सुखसुविधायुक्त मुलींचे वसतिगृह बांधले आहे. या वसतिगृहात अधीक्षक राहात नाही. अधीक्षकांचे दुर्लक्ष असल्याने वसतिगृहातील मुली नेहमी आजारी पडतात. मुलींच्या आरोग्याची अधीक्षकांकडून काळजी घेतली जात नसून मुलींच्या आरोग्य व आजाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आजारी मुलींकडून आजारी का पडल्या, याचे लेखी लिहून मागितले जाते. अधीक्षक निर्वाह भत्ता वेळेवर व पूर्ण देत नाही. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी वसतिगृहाला भेट देण्यास आले तर तक्र ारी करू नका, असा दम अधीक्षक देतात. वसतिगृहातील मुलींना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्र ार या मुलींनी केली आहे. (वार्ताहर)