अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने घरातून घेतले ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:01 IST2026-03-31T19:59:17+5:302026-03-31T20:01:13+5:30

अशोक खरात याचे कुटुंबीयही पोलीस आणि एसआयटीच्या रडारवर आले आहेत. पोलीस आणि एसआयटीच्या पथकाने त्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. 

Ashok Kharat's son taken into custody by SIT from his house, wife Kalpana Kharat absconding | अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने घरातून घेतले ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने घरातून घेतले ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

अशोक खरात याने महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि एसआयटीमार्फत सुरू आहे. महिलांचे शोषण करण्याबरोबरच खरातने पैसेही उकळल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला आहे. खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी पथक आले होते, मात्र ती फरार झाली आहे. दरम्यान, पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. 

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कल्पना खरातही या प्रकरणात आरोपी बनली आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने अशोक खरात यांच्या मुलाला ताब्यात घेतले. 

पथक अशोक खरातच्या मुलाला घेऊन गेले आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

जमीन खरेदी, कोट्यवधींची फसवणूक 

शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघे अशा पाच जणांविरोधात जमीन बळजबरी खरेदी केल्याची आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांनी या प्रकरणात अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक केली आहे. रावसाहेब गोंदकर यांच्यावर सुरूवातील १५ लाखांचे पतसंस्थेचे कर्ज झाले होते. किरण सोनवणे आणि बावके यांनी आणखी मोठे कर्ज उभारण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्यावरील कर्ज २ कोटी ५ लाखांवर पोहोचले. 

त्यानंतर सोनवणे आणि बावके यांनी अशोक खरात सोबत गोंदेकर यांची भेट घालून दिली. गोंदेकर यांची जमीन गहाण ठेवून पैसे घेण्याचे ठरले होते. पण, ऐनवेळी गोंदेकर यांच्यावर दबाव टाकून जमीनच खरातच्या नावावर करण्यात आली. त्यानंतर खरातने जमीन व्यवहाराचेच पैसे व्याजाने दिले आणि त्याची वसुलीही केली, असा आरोप गोंदेकर यांनी केलेला आहे.

Web Title : अशोक खरात का बेटा हिरासत में, पत्नी यौन शोषण मामले में फरार

Web Summary : अशोक खरात का बेटा यौन शोषण मामले की जांच के बीच हिरासत में लिया गया। खरात की पत्नी कल्पना भी भूमि धोखाधड़ी में शामिल है और फरार हो गई है। पुलिस खरात और उसके सहयोगियों से जुड़े भूमि सौदों में वित्तीय अनियमितताओं की जांच कर रही है।

Web Title : Ashok Kharat's Son Detained, Wife Absconding in Abuse Case

Web Summary : Ashok Kharat's son was detained amidst a sexual abuse investigation. Kharat's wife, Kalpana, is also implicated in a land fraud case and has fled. Police are investigating financial irregularities related to land deals involving Kharat and his associates.