लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: पोलिसांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता नवनवीन तक्रारी दाखल होत आहेत. त्यात आता खरात याने जमिनीच्या वादातून आपल्या भावाचा घातपात केल्याचा आरोप गौळाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात विलास यांनी एसआयटीकडे तक्रार अर्ज दिला आहे.
विलास जाधव यांच्या म्हणण्यानुसार दिवंगत भाऊ कैलास जाधव यांनी ५ ऑगस्ट २०२२ रोजी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन १२ जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि गुन्हेगारी संगनमताचे आरोप केले होते. यामध्ये १२ जणांसह अशोक खरात आणि त्याच्या पत्नीचेही नाव नमूद करण्यात आले होते.
इसारा पावती केलेली जमीन खरातने बळकावली
नाशिक तालुक्यातील मौजे गौळाणे येथील जमीन खरेदीसाठी सुमारे ५० ते ५४ लाख रुपये आरोपींना देण्यात आले. तथापि, पूर्ण रक्कम स्वीकारूनही संबंधित जमीन आरोपींनी परस्पर संगनमत दि. १९ जुलै २०२२ रोजी खरेदीखत दस्त नोंदणी करून अशोक खरात व कल्पना अशोक खरात यांच्या नावे करण्यात आली होती.
याबाबत विचारणा केल्यावर आरोपींकडून ‘जमिनीत पाय ठेवला तर ठार मारू’, अशा धमक्या वारंवार दिल्याचेही कैलास यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर कैलास याने न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता होती. मात्र, दोन दिवस अगोदरच कैलास यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यावेळीही आपण पोलिस ठाण्यात खरात यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.
हिवरेबाजार ग्रामस्थांकडून भोंदूबाबा खरातचा निषेध
अहिल्यानगर : राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (हिवरेबाजार) यांचे भोंदूबाबा अशोक खरातसोबतचे विविध कार्यक्रमांतील व्हिडीओ समाज माध्यमांवर असल्यामुळे पवार यांच्यावरही आक्षेप घेतले जात आहेत. पवार यांसह हिवरेबाजार ग्रामस्थांनी सोमवारी खरातचा निषेध करीत आम्ही आजवर खरातशी केवळ आध्यात्मिक भावनेतून जोडलेलो होतो, हे स्पष्ट केले.
खरातची जेव्हा कधी भेट झाली ती केवळ आध्यात्मिक अंगाने होती. अध्यात्म व ज्योतिषाच्या नावाखाली खरात असा विकृत वागत असेल याची पुसटशीही कल्पना कधी नव्हती. त्याचे जे कृत्य समोर आले त्याचे आपण कधीही समर्थन करणार नाही. अशा प्रवृत्तीला शिक्षाच व्हायला हवी, असे पवार म्हणाले.
Web Summary : Ashok Kharat faces new accusations, including murder related to land disputes. A farmer alleges Kharat orchestrated his brother's death after a land deal dispute and provided evidence to the SIT. Villagers condemn Kharat's actions.
Web Summary : अशोक खरात पर जमीन विवादों से जुड़ी हत्या सहित नए आरोप लगे हैं। एक किसान ने आरोप लगाया कि खरात ने जमीन सौदे के विवाद के बाद अपने भाई की मौत की साजिश रची और एसआईटी को सबूत दिए। ग्रामीणों ने खरात के कृत्यों की निंदा की।