शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

येवला बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 5:32 PM

कांद्यास देशांतर्गत चांगली मागणी वाढल्याने सप्ताहात कांदा आवक ५८४५ क्विंटल झाली

ठळक मुद्देसप्ताहात सोयबीनची एकुण आवक १९१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० रुपये ते कमाल ३९५१ तर सरासरी ३७७५ रूपयापर्यंत होते.

येवला : येथील बाजार समिती आवारात लाल कांद्याच्या आवकेस सुरु वात झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत चांगली मागणी वाढल्याने सप्ताहात कांदा आवक ५८४५ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २००० हजार ते कमाल १४ हजार रुपये आणि सरासरी ११ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर लाल कांद्याचे बाजारभाव किमान एक हजार ते कमाल १० हजार १०० रुपये आणि सरासरी ५५०० रूपये प्रति क्विंटल पर्यंत होते.सप्ताहात बाजार समितीत गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हाची एकुण आवक १८ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १७५० रूपये ते कमाल २५०१ रुपये तर सरासरी १९९० रुपयापर्यंत होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक १७५ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १५५० रूपये ते कमाल २४५१ रुपये तर सरासरी १७७५ रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची एकूण आवक १६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान २९४२ रुपये ते कमाल ४१०० रुपये तर सरासरी ३८५० रुपये पर्यंत होते. सप्ताहात सोयबीनची एकुण आवक १९१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० रुपये ते कमाल ३९५१ तर सरासरी ३७७५ रूपयापर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले. मक्याची एकुण आवक ५ हजार २७७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १५०१ ते कमाल १९७२ रुपये तर सरासरी १८२५ रूपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे मक्याची एकुण आवक १२ हजार ५५ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १५०० ते कमाल २००० रुपये तर सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार पाटोदा येथे मक्याची एकुण आवक ६५०१ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १६०० ते कमाल २०२२ तर सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा